Back to website

Wednesday, 18 March 2015

गुढीपाडवा



मराठी नवे वर्ष चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा पासून सुरु होते. दरवर्षी रूढीनुसार गुढी उभारून, गोडधोड करून प्रत्येकजण आपापल्या चालीरीती प्रमाणे सण साजरा करतो. निसर्गामध्ये ही बदल घडत असतो. नविन पालवी फुलू लागते. बाहेर हे आपण दरवर्षीच बघतो. आज मात्र आपण आंतरिक गुढी कोणती? गुढीपाडवा खरा  कसा  साजरा  करायचा? हे खाली दिलेल्या पदातून बघूया -

'गु' कार अज्ञान, अंधकार, फासा गळा लागला जीवा
'ढि' ला करा हो, वाचवा हो सद्गुरु देवा s s s   l l धृ l l 

'गु' करा घेउनी गुरगुरतो जीव त्यासी समजावा
'गु 'रुगुरू नको शांतीवरी तू सद्गुरु भजावा l l l l    

'ढि'ला पडू नको परमार्थामध्ये सावध करावा l
'ढि ' येथे काही कामाची नाही,जाणुनी वागवा l l l l 

'पा'चाचा प्रपंच पाचातच राहू दे, एकात घुसवावा l
'पा'हावा परमात्मा सगळी कडे, एकच जाणावा l l l l  

''गमगु नको लटपटू नको, फटक्याने नशिबाच्या
'' कुणाची बाळगू नको, निर्भय रहावा l l l l

'वा ' कुणाची वाटू नकोगुरुगुरू वदावा
'वा 'णी माधुरीची दत्ता ठकू वदवी त्याते स्मरावा l l  l l 

ऐशा गुढीपाडव्याला 'गु'कार 'ढि' ला 'पा'डावा
स्वानंदाची गुढी उभारा साजरा पाडवा l l l l 

तुमची गुढी कशी आहे?

आपण सगळेच असा पाडवा साजरा करूया का

तुमचे विचार, नवीन ideas आणि comments लवकर post करा …. 

सर्व वाचकांना नविन वर्षाच्या शुभेच्छा!