मराठी नवे वर्ष चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा पासून सुरु होते. दरवर्षी रूढीनुसार गुढी उभारून, गोडधोड करून प्रत्येकजण आपापल्या चालीरीती प्रमाणे सण साजरा करतो. निसर्गामध्ये ही बदल घडत असतो. नविन पालवी फुलू लागते. बाहेर हे आपण दरवर्षीच बघतो. आज मात्र आपण आंतरिक गुढी कोणती? गुढीपाडवा खरा कसा साजरा
करायचा? हे खाली दिलेल्या पदातून बघूया -
'गु' कार अज्ञान, अंधकार, फासा गळा लागला जीवा l
'ढि' ला करा हो, वाचवा हो सद्गुरु देवा s s
s l l धृ l l
'गु' करा घेउनी गुरगुरतो जीव त्यासी समजावा l
'गु 'रुगुरू नको शांतीवरी तू सद्गुरु भजावा l l १l l
'ढि'ला पडू नको परमार्थामध्ये सावध करावा l
'ढि 'ल येथे काही कामाची नाही,जाणुनी वागवा l l २ l l
'पा'चाचा प्रपंच पाचातच राहू दे, एकात न घुसवावा l
'पा'हावा परमात्मा सगळी कडे, एकच जाणावा l l ३ l l
'ड'गमगु नको लटपटू नको, फटक्याने नशिबाच्या l
'ड'र कुणाची बाळगू नको, निर्भय रहावा l l ४ l l
'वा 'ण कुणाची वाटू नको, गुरुगुरू
वदावा l
'वा 'णी माधुरीची दत्ता ठकू वदवी त्याते स्मरावा l l ५ l l
ऐशा गुढीपाडव्याला 'गु'कार 'ढि' ला 'पा'डावा l
स्वानंदाची गुढी उभारा साजरा पाडवा l l ६ l l
तुमची गुढी कशी आहे?
आपण सगळेच असा पाडवा साजरा करूया का?
तुमचे विचार, नवीन ideas आणि
comments लवकर post करा
….
सर्व वाचकांना नविन वर्षाच्या शुभेच्छा!
8 comments:
Yes
Appan aple kadu swabhav va anubhav khaun god swanda nij shesti chi prapanchha kathi var ubharuyaa
सर्वाना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ! "गु"कार "ढी"ला पडून गुरूभक्तीचा "पा"वा आणि "ड"मरू जोरात "वा"जु दे हीच सद्गुरुचरणी प्रार्थना !
सद्गुरुनाथ महाराज की जय !
नाशिक मुक्कामी गुढीपाडवा साजरा जाहला याचा हरीखू आगळा. गुरुदेवांनी बाळांना ज्ञानामृत पाजिले. बाळे धन्य जाहली. बोधावा अंतरी रुजावा, गुरुदेवांनी रुजवून घ्यावा.
शिबिराचे नंतर दिनचर्या सुरु जाहली. पहिली प्रचीती मजला आली.
गुरुदेवे हाका मारुनी उठविले मज अरुणोदायावेळी.
आळस झाडुनी देह उठविला. तुळशी मंजिरा मुखी धरिली. गुरुगीता वाचिली. क्रमे लागीलो. क्रम आला नादब्रह्म पूजेचा ...
रागु कंठी भीमपालासू ...
बंदिश एक उलगडली ...
रचना सनत्कुमारी कर्ता ...
स्थायी :
पावत कोऊ नाही पार
सुरनर सकल ब्रह्म अपार
अंतरा :
गुनी गंधर्व किन्नर, नाग सेवत,
सोही सनतकुमार, पायो दाव,
अबकी बार ..
गुरुनाथाने पेरीलेली खुण मनी आली, गाठ तिची करून टाकली.
नाग सेवत, ... नाग सेवत, ... नाग सेवत, ...
लागला माये, अर्थ ..
आज इतुकेच. सुखे संतोषा न यावे, नित निजखुणा शोधीत पुढे न्यावे.
सद्गुरुनाथ महाराज की जय !
सचिन बालकु.
सत्कर्मी भजती माते अर्जुना ते चतुर्विध
ते असे आर्त, जिद्न्यासु अर्थर्थी आणि द्न्यानी हे ॥१६॥
त्यात श्रेष्ठ असे द्न्यानी एकत्वी नित्ययुक्त जो
प्रिय तोच मला भक्त मीही प्रिय तसा तया ॥१७॥
Gudhipadva god zala. Amucha ram gharasi ala. Gurudevanchya gudhila navin 10 battashacha har jadla. Gurubhaktanchi swanandachi gudhi unchach unch ubharli geli.
परमार्थात ढिला पडू नको , तर प्रपंचाचा फास ढिला कर असा अनुभव देवून गुरुदेवांनी आमची हि स्वानंदाची गुढी साजरी केली . धड ही काठी ,त्यावर मस्तक म्हणजेच उलटा कलश ,कडू गोड अनुभव - कडुलिंब आणि साखरगाठी ,महाकारण भरजरी वस्त्र ,त्याला सु- मनाचा हार अश्या ह्या गुढीला नमस्कार
Once our revered Gurudev S S Madhurinath Maharaj in one the discourse has described about the process of getting up in the morning after the night sleep. HE said that we can get up in two ways basically 1) with sense of our daily chores and its planning thought and another is 2) with the sense and awareness of "Soham".
So it reminds me on this occasion of GudiPadwa that We gurubakt every day hoist our Gudi high by getting up with "Soham" thought.
सद्गुरुनाथ महाराज की जय !
"सत्कर्मी भजती" ...
हा गुरुदेवांनी कळविलेला उपदेश, घरी पाठविलेला प्रसाद, पोचला. शिरसावंद्य.
सचिन ला नेमका आनंद कसला झाला ? भोजन करतांना "मर्म जाणूनी ग्रास आहुती घ्या" असे आपण म्हणतो.
नादब्रह्म पंक्तीत बैसलो असता शांत, गाऊ लागलो एकचित्त ....
"मर्म जाणूनी" यातील उप्देशान्वये शब्दार्थ, वाच्यार्थ, मतितार्थ, गूढ अर्थ, अन्वयार्थ, याबरोबर मर्म शोधू लागलो.
"पावत कोऊ नाही पार
सुरनर सकल ब्रह्म अपार
गुनी गंधर्व किन्नर, नाग सेवत,
सोही सनतकुमार, पायो दाव,
अबकी बार "
ही धृपदाची एक सांगीतिक रचना.
रचनेकडून पाहता, धृपदाची माता म्हणजे वेदवाणी, तर "रचनाकार" हे मंदिर परंपरेतील सात्विक संत भक्त असत. {तानसेनाचे गुरु हरिदासंसारखे}
वरील रचनेत, शब्दाकडून उपायोजिलेली एक खुण आहे असे लक्षात आले.
"नाग सेवत" हे यातील मर्म.
"गुनी गंधर्व किन्नर" हे "गण", अर्थात कलावंत.
ह्यांना कुठला तरी नाग हमखास गिळतो म्हणून
"पायो दाव" .. मिळालेला डाव धन्य कर असे सनतकुमार सांगत आहेत. सर्पयज्ञच नाही का ?
एरवी असा कळणार नाही. गुरूदेवांची कृपा.
जय देवा,
सद्गुरुनाथ महाराज की जय !
Post a Comment