तळ ठोकणार आहे इकडेच कायमचा असं कुठे म्हणतीए मी
पण आता आलाच आहे वाटेत हा विसावा तर घुटमळते ना क्षणभर !
करायचाच आहे ठरलेला प्रवास... नाही कुठे म्हटलंय मी
पण मिळतोच आहे थोडा गारवा तर विलसते ना क्षणभर !
भरकटणार नाहीच आहे मीच निवडलेल्या वाटेवरून मी
पण भार उतरवून तना-मनावरून उधळते ना क्षणभर !
हो, तुच आणून उभं केलंस या वाटेवर... तुझं श्रेय नाही घेणार
मी
पण वाटेवरच्या ज्ञात-अज्ञात गमती-जमतींवर खिदळते ना क्षणभर
!
असले बरेच खाचखळगे आणि कडेकपारी तरी प्रारब्धाची फुलंच
मानली मी
पण त्यातल्याच एका फुलाचा सुगंध उरात भरून हरखते ना क्षणभर
!
स्वीकारतेय ना तुझी सगळीच सुमधुर, कर्णकर्कश, श्रवणीय,
बीभत्स गीतं मी
पण मंद शब्दांची सळसळ कानात साठवून डुलते ना क्षणभर !
आखीव-रेखीव, सुबक, नीटनेटकं असा तकलादू हट्ट कधी धरलाच नाही
मी
पण हाताशी येऊन सुटलेल्या, निसटलेल्या क्षणांवर रुसते ना
क्षणभर !
नाही म्हणता-म्हणता रमलेच की वाटेवरच्या प्रत्येक वळणाशी मी
पण रमता रमता थोडंसं थांबून सुटलेलं भान शोधते ना क्षणभर !
दिपणारया डोळ्यांना सताड उघडे ठेऊन वाटेला सामोरी जाणारच
आहे मी
पण मननाच्या पारावर बसून दिपवणाऱ्या घटनांचा अर्थ कवटाळते
ना क्षणभर !
लोभसवाण्या मोहांना मागे टाकून तुझ्या स्वाधीन होणारच आहे
मी
पण मायेच्या प्रांगणात उतरण्याआधी स्वतःवर हक्क गाजवते
ना क्षणभर !
सगुणाच्या हातात हात देऊन निर्गुणाच्या कुशीत झेपावणारच आहे
मी
माधुरीच आहे मी खरी पण
तनुजा म्हणून जगते ना क्षणभर !By Tanuja Sawant
5 comments:
Visava changla aahe.
Ekdam mast....~alps
Himalayachya agrashi Janyachya anand tar ahech motha Pan tya tokaparyant janyacha pravasahi ahe khup sukhakar.
वा .. क्या बात है .. सगळ्याच कविता छान होता आहेत ... लिहित रहा ...
Mala P P Maooli na bhetaychi eccha aahe. Maze nav Manoj Yashwant Muley aahe. mi Panvel la rahato. Maza cell no. 9819540448 aahe. pl give me phone no and address of mavooli so that I can contact her.
Post a Comment