Back to website

Thursday, 2 April 2015

हनुमान जयंती

।। श्री सद्गुरु प्रसन्न ।।

गुढीपाडवा, राम नवमी व हनुमान जयंती असा क्रम आहे.

'गुढी नभात उंचवू' असे म्हणतच पंचमहाभुतांच्या या गुढीला पंचतत्त्वांपासून वेगळे काढायचे. राम नवमी 
साजरी  होऊन राम राज्य स्थापन झाल्यावर त्याचे  पालन तर व्हावयास हवे. ते कसे? हनुमान जयन्ती 
साजरी करुनच! 

हनुमान - मारूती 
'मा' म्हणजे जी नाही पण भासते, त्या मायेला 'रु'  म्हणजे ज्ञान सूर्याने 'ती' म्हणजेच तिलांजली द्यायची. 
तेव्हाच सीता (स्वानुभूती) रामराज्यात परत येईल. त्यासाठी हनुमंतासारखी भक्ती अपेक्षित आहे.  

भक्तीची ताकद ही सर्व बळांमध्ये श्रेष्ठ असून ती पूर्णत: लीन आहे. एखाद्या व्यक्तीच्या प्रेमासाठी आपणकाहिही करायला तयार होतो. ती प्रेमाची शक्ती! भक्ती म्हणजे प्रेमाची अत्युच्य पायरी. 

सर्व शक्तींची शक्ती म्हणजेच भक्ती! हिचे रूपक म्हणजे हनुमान! जो शारीरिक बलानेही समृद्ध होता. 

ही भक्ती, शरीर, मन, बुध्दी इत्यादी समर्थ करते. बाहेरील औषधे ही नाममात्र असतात. परंतु भक्ती ही 
आंतरिक शक्तीने सर्व घडविते.

मन को जिसने मार दिया, वो हि है हनुमान । 
बाहर भक्ती भितर ज्ञान, दोनो एकसमान ।।

विविध प्रकारे, वेगळ्या पैलूने, मारुतीचे वर्णन व कार्याची या ब्लॉग वर चर्चा करूया.   


6 comments:

Unknown said...

Maruti kasa chirnjeevi Va ram sarva karto tar maruti sakat mochhan kasa?

नीता said...

मारूती (भक्ति)शिवाय राम कार्यरत होत नाही, म्हणून मारूती संकटमोचन आहे.तसेच जोपर्यंत राम आहे तोपर्यंत भक्ती म्हणजेच मारुती असणारच! म्हणूनच तो चिरंजीवी आहे.

Unknown said...

Wa thanks

Unknown said...

manala kase marave mhanje aat bhaer ek saman anubhavta yeel?

Manasi kulkarni said...

मनाला एक नौकर समजून त्यावर ताबा ठेवला तर आपण त्याच्या हाताचे बाहुले होणार नाही . बाहेर व्यापक सद्गुरु व आत मी आत्मा गुरु दोन्ही एकच आहे .

Unknown said...

Pan tech tar kathin ahe hoot nahi kase karave kuthali sadhana keli ke te jagevar basel