Back to website

Wednesday, 3 August 2016

कैसे बताऊँ कौन हो तुम


त्रिगुणोंका निर्माण हो तुम, महाभूतोंका संचार हो तुम |
इंद्रियोंका व्यापार हो तुम, पच्चीस तत्वोंका निर्वाण हो तुम ||१||
कैसे बताऊँ कौन हो तुम |

सृष्टी की रचना हो तुम, माया की वंचना हो तुम |
शिव की धारणा हो तुम, जीव की कल्पना हो तुम ||२||
कैसे बताऊँ कौन हो तुम |

ब्रह्मा का उन्मीलन तुम, विष्णु का सम्मीलन तुम |
शंभू का निर्दालन तुम, ईश्वर का उच्चारण तुम ||३||
कैसे बताऊँ कौन हो तुम |

संचित का ज्वलन हो तुम, प्रारब्ध का हवन भी तुम |
क्रियमाण का अर्पण तुम, भवसागर का आचमन हो तुम ||४||
कैसे बताऊँ कौन हो तुम |

स्थूल का अस्तित्व तुम, सूक्ष्म का गंतव्य तुम |
कारण का भास्यत्व तुम, महाकारण का वास्तव्य तुम ||५||
कैसे बताऊँ कौन हो तुम |

भूत का फुत्कार हो तुम, भविष्य की चीत्कार हो तुम |
वर्तमान का डंका तुम, त्रिकालाबाधित नि:शंका तुम ||६||
कैसे बताऊँ कौन हो तुम |

मत्स्य का विस्तारण तुम, कूर्म की मजधार भी तुम |
वराह का संहारण तुम, नरसिम्हा की गर्जना हो तुम ||७||
कैसे बताऊँ कौन हो तुम |

वामन का आवाहन तुम, परशु का शरणाहन तुम |
बुध्द का आक्रन्दन तुम, कबीर का स्वच्छंदन तुम ।।८।।
कैसे बताऊँ कौन हो तुम ।

सीता का पावित्र्य तुम, लक्ष्मण का स्वाभिमान हो तुम,
दशरथ का विरह भी तुम, राम की निष्ठा हो तुम ।।९।।
कैसे बताऊँ कौन हो तुम ।

राधा की मुसकान हो तुम, मीरा का विश्वास हो तुम |
यशोदा का दुल्हार हो तुम, कृष्ण की लीला भी तुम ।।१०।।
कैसे बताऊँ कौन हो तुम |

भास्कर की तप्तता हो तुम, शशी का सौहार्द तुम ।
पर्वतोंकी गंभीरता तुम, झरनोंकी चंचलता तुम |।११।।
कैसे बताऊँ कौन हो तुम ।


पंखोंका गुंजारव तुम, पौधोंकी ललकार हो तुम
प्राणिमात्र का आलाप हो तुम, मनुष्य का वार्तालाप भी तुम ||१२।|
कैसे बताऊँ कौन हो तुम |

बलभीम का साहस हो तुम, भागीरथी का प्रवाह तुम |
दत्तू का दृष्टीकोन भी तुम, तनुजा की हृदय में बसे माधुरी का स्वानुभव हो तुम ||१३||
कैसे बताऊँ कौन हो तुम |

तनुजा सावंत 

Sunday, 1 May 2016

विसावा



तळ ठोकणार आहे इकडेच कायमचा असं कुठे म्हणतीए मी 
पण आता आलाच आहे वाटेत हा विसावा तर घुटमळते ना क्षणभर !

करायचाच आहे ठरलेला प्रवास... नाही कुठे म्हटलंय मी
पण मिळतोच आहे थोडा गारवा तर विलसते ना क्षणभर !

भरकटणार नाहीच आहे मीच निवडलेल्या वाटेवरून मी
पण भार उतरवून तना-मनावरून उधळते ना क्षणभर !

हो, तुच आणून उभं केलंस या वाटेवर... तुझं श्रेय नाही घेणार मी
पण वाटेवरच्या ज्ञात-अज्ञात गमती-जमतींवर खिदळते ना क्षणभर !

असले बरेच खाचखळगे आणि कडेकपारी तरी प्रारब्धाची फुलंच मानली मी
पण त्यातल्याच एका फुलाचा सुगंध उरात भरून हरखते ना क्षणभर !

स्वीकारतेय ना तुझी सगळीच सुमधुर, कर्णकर्कश, श्रवणीय, बीभत्स गीतं मी
पण मंद शब्दांची सळसळ कानात साठवून डुलते ना क्षणभर !

आखीव-रेखीव, सुबक, नीटनेटकं असा तकलादू हट्ट कधी धरलाच नाही मी
पण हाताशी येऊन सुटलेल्या, निसटलेल्या क्षणांवर रुसते ना क्षणभर !

नाही म्हणता-म्हणता रमलेच की वाटेवरच्या प्रत्येक वळणाशी मी
पण रमता रमता थोडंसं थांबून सुटलेलं भान शोधते ना क्षणभर !

दिपणारया डोळ्यांना सताड उघडे ठेऊन वाटेला सामोरी जाणारच आहे मी
पण मननाच्या पारावर बसून दिपवणाऱ्या घटनांचा अर्थ कवटाळते ना क्षणभर !

लोभसवाण्या मोहांना मागे टाकून तुझ्या स्वाधीन होणारच आहे मी
पण मायेच्या प्रांगणात उतरण्याआधी स्वतःवर हक्क गाजवते ना क्षणभर !

सगुणाच्या हातात हात देऊन निर्गुणाच्या कुशीत झेपावणारच आहे मी
माधुरीच आहे मी खरी पण तनुजा म्हणून जगते ना क्षणभर !

 By  Tanuja Sawant

Sunday, 10 May 2015

छापा काटा


।। श्री सद्गुरु प्रसन्न ।।

नरसिंह जयंती उत्सव सगळ्यांना प्रिय आहे . प्रत्येक गुरुभक्त तमोगुणी हिरण्याक्ष मारून (चकाकणाऱ्या  वस्तूंना बाजूला सारून व संसारातून  फट काढून ) नारद मुनीच्या  आश्रमात  जमा होतात . 

जस जसे श्रवणाचा आनंद घेत पुढे सरकतो ,तेव्हा आंतरिक मायेचा थारा - रजोगुणी  अहंकार, शरीरात  इकडे तिकडे पळत सुटतो व लपण्यासाठी  जागा शोधत फिरतो ,त्याला  पळता भुई  थोडी होते .

"  स्मरता  नित्य हरी मग ती माया काय करी . " जसे भक्त प्रल्हादावर आत संस्कार होत असतात ,तसेच बाहेर नरसिंहाचा अवतार घडत होता. वासना बाहेर पळून गेल्याचे  व त्यावर नियंत्रण ठेवल्याचे लक्षण - 
कुरळे केस (आयाळ ) व  (नखे ) असत ,जड, दु:ख रुपाची जावून ती आंतरिक आस्ति ,भाती ,प्रिय रुपाची वळलेली दिसली . 
स्थूल  व सूक्ष्म "मी " नाही  ह्या दोन झालेल्या खांबातून सर्व गुरुभक्त गुरगुरत  बाहेर पडत होते . 
गुरुनाम उंबरठ्यावर हिरण्यकश्यापुला घेतले याचे प्रतिक स्वबळावर लळीताचा मांड घालून त्यातून हिरण्यकश्यपुचे जसे कोथळे (आतडे ) बाहेर काढले तसे प्रत्येक भक्ताचे अनुभव  व कळा बाहेर पडत होत्या . त्यांनाही मुक्ती मिळत होती . 

शिष्य माये मध्ये न अडकता सगळ्या उपक्रमात आनंदाने भाग घेताना दिसत होता . साधकांना प्रमाणपत्र प्रतिक मिळा ल्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसत होता तेव्हा. व्हि शांताराम यांच्या नवरंग सिनेमातील "आधा है चंद्रमा रात आधी" गाण्याची आठवण झाली. बाहेरील स्थूळ देहावर नरसिंह अवतार धारण करून हृदयात भक्त प्रल्हाद असे रूप एकाच वेळी (संधिगत परमात्म्याचे) दिसत होते. मायेने घडलेल्या कायेला गुरुसहाय्याने हरी रूपात परिवर्तन करून रोजच्या दिनचर्येत काय काय रंग ढंग करील त्याचा सामना करण्यासाठी द्रष्टा होऊन सख्य व अर्पण भक्तीचे सुदर्शन चक्र हाती घेऊन (भक्त प्रल्हाद) ते रूप अंतरात धरून बाहेर पडतांना दिसत होते. 

पण बर का हो…… 
  • पुढील नरसिंह जयंती पर्यंत ते रूप टिकवणे, प्रत्येक भक्ताच्या हातात असेल. 
  • आपण त्यांचा सांभाळ करण्यासाठी सद्गुरुंकडे शक्ती मागूया.    
  • हाच निश्चय, Good Behavior रूपाने सांभाळू. 
  • त्यासाठी काहिही करावे लागले तरी ते करूया. 
  • निजरंगात रंगून ते गुरुचरणी अर्पूया 
चल तर मग, लागा कमाला. 

Get Set Go

Sunday, 26 April 2015

बुरा मत देखो....


बुरा मत देखो....
बुरा मत देखो, बुरा मत कहो, बुरा मत सुनो हे आपण सगळेच जाणतो. सहजच वाटलंकी  

बुरा मत देखो 
बुरा मत देखो म्हहणजे फक्त बाह्य दृष्टी नव्हे तर तर जे पाहतो ते आत जाऊ न देणे व त्याचा मनबुध्यादिकांवर परिणाम होऊ न देणे,  अर्थातच त्यांना तंदुरुस्त ठेवणे. आपण टिव्हीवर एखादे दृश्य पाहतो किंवा एखादी हॉरर फिल्म पाहतो, त्याचा वाईट परिणाम आत जाऊ न देणे. ते पडद्यावरचे दृश्य समजून विसरणे! अगदी तसेच मन:पटलावर
कोरलेले सिनेमे (अनुभव) पण खोटेच आहेत हे जाणले पाहिजे.

बुरा मत कहो
बुरा मत कहो म्हणजेच आपल्या मुखाने वाईट बोलू नये इतकेच सीमित नसून आतमध्ये जर नको असलेली विचारधारा उठली तर तिला झटकुन टाकता आले पाहिजे. 

बुरा मत सुनो
बुरा मत सुनो लाही हे लागू होते. वाईट शब्द ऐकून आपल्या आत खोल गड़बड़ होता कामा नये. मागील लेखातील 'बंद दरवाजा खोल रे' मध्ये अपेक्षित दरवाजा असाच आहे नाही का? आपल्या अंत:करणाला यापासुन लांब ठेवतो व गुरुमुखाने श्रवण होताना मात्र उघडा होऊन सर्व काही ग्रहण करतो. दरवाजा आपणच निर्माण केला आहे नाही का? 

यावर तुमचे वेगळे मत असु शकते. पण ते काय आहे हे आम्हाला कळु द्या. आपल्या प्रतिक्रिया जरूर post करा.

Saturday, 18 April 2015

आली आली नृसिंह जयंती ………

।। श्री सद्गुरु प्रसन्न ।।

नृसिंह जयंती जशी  जशी  जवळ येत आहे तसे  तसे  पोटात गुदगुल्या सुरु झाल्या आहेत ( butterflies in  the  stomach). एकदा कधी गोराईला पोहोचू अशी अवस्था सगळ्याच गुरुभक्तांची असते.
आपल्या जन्माची कहाणी ऐकण्याची  मज्जाच असते सगळ्यांना. 
गुरुदेव अगदी आरामात रंगवून रंगवून सगळ्या भक्तांना त्यांच्यातल्या प्रल्हादाची  जाणीव करून देत असतात. 
एका राक्षसी कुळात जन्मल्यावर सुद्धा सद्गुरुकृपेनी आणि श्रवणाने 
सद्भक्त कसा सहज वर वर जातो हे ऐकण्यात  किती मज्जा येते.   
आणि खरच आहे आपले सगळे कुळ (नोकर)  राक्षसीच असतात पण 
संत वचनांनी ते कसे बदलतात हे गुरुदेव आपल्या दाखवून देतात . 
सगळ्या बाल साधकांची तर मज्जाच असते . आपण  गुरुदेवांसमोर 
बालरूप  घेऊन  श्रवणाला बसणे  म्हणजे  स्वर्गाचाच अनुभव 
होण्यासारखे, आपण हे भोगायलाच गोराईला धावत असतो पण 
गुरुदेव मात्र सतत आपल्याला ह्या मायेतन कसे  सटकायचं हे शिकवत असतात . 
" स्मरता नित्य हरी मग ती माया काय करी …"
नाभीस्थाना वर बसून मी विभु रूप कसा आहे हे सहज खेळातुन, 

नाटकातून, चित्रकलेतून आपल्या ला शिकायला मिळत. आपल खर रूप पाह्यला मिळत …. जगात हरी रूप होऊन कस फिरायच आणि कशी 
सगळी मौज लुटायची हे फक्त इकडेच आपण शिकतो । 
मग काय आपल सामान बांधा आणि भेटूया उत्सवात ……. 
जय देवा  …… 


ताजा कलम - या शिबिरात काय नविन आपण सादर करणार ,new ideas,suggestions  लवकरात लवकर पोस्ट करा .

Thursday, 2 April 2015

हनुमान जयंती

।। श्री सद्गुरु प्रसन्न ।।

गुढीपाडवा, राम नवमी व हनुमान जयंती असा क्रम आहे.

'गुढी नभात उंचवू' असे म्हणतच पंचमहाभुतांच्या या गुढीला पंचतत्त्वांपासून वेगळे काढायचे. राम नवमी 
साजरी  होऊन राम राज्य स्थापन झाल्यावर त्याचे  पालन तर व्हावयास हवे. ते कसे? हनुमान जयन्ती 
साजरी करुनच! 

हनुमान - मारूती 
'मा' म्हणजे जी नाही पण भासते, त्या मायेला 'रु'  म्हणजे ज्ञान सूर्याने 'ती' म्हणजेच तिलांजली द्यायची. 
तेव्हाच सीता (स्वानुभूती) रामराज्यात परत येईल. त्यासाठी हनुमंतासारखी भक्ती अपेक्षित आहे.  

भक्तीची ताकद ही सर्व बळांमध्ये श्रेष्ठ असून ती पूर्णत: लीन आहे. एखाद्या व्यक्तीच्या प्रेमासाठी आपणकाहिही करायला तयार होतो. ती प्रेमाची शक्ती! भक्ती म्हणजे प्रेमाची अत्युच्य पायरी. 

सर्व शक्तींची शक्ती म्हणजेच भक्ती! हिचे रूपक म्हणजे हनुमान! जो शारीरिक बलानेही समृद्ध होता. 

ही भक्ती, शरीर, मन, बुध्दी इत्यादी समर्थ करते. बाहेरील औषधे ही नाममात्र असतात. परंतु भक्ती ही 
आंतरिक शक्तीने सर्व घडविते.

मन को जिसने मार दिया, वो हि है हनुमान । 
बाहर भक्ती भितर ज्ञान, दोनो एकसमान ।।

विविध प्रकारे, वेगळ्या पैलूने, मारुतीचे वर्णन व कार्याची या ब्लॉग वर चर्चा करूया.