Back to website

Wednesday 25 February 2015

सफर मे Don’t Suffer

।। श्री सद्गुरु प्रसन्न ।।

सफर मे Don’t Suffer

"जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही ……… चला दोस्तहो आयुष्यावर बोलू कहि……… " असे म्हणत आपला प्रवास मागील BLOG पासून सोबती सोबतीने  सुरु तर छान झाला. 

एका मित्राच्या BLOG वरील प्रतिक्रियेत " हा प्रवास खूप आनंददायी आहे" असे आले. आपण हा प्रवास भक्तिमार्गावरून सुरु केला आहे. कुठलाही प्रवास वा नविन गोष्ट सुरु करतांना ठेचकाळणे, धडपडणे हे आलेच. सुरुवातीला हा प्रवास कठीण जातो.  कारण, "मी म्हणजे देह" हा भाव अतिशय घट्ट असतो, ती गाठ काही केल्या सुटत नाहि. म्हणून भक्ती मार्गाच्या वाटेतून वारंवार घसरत असतो. 

या वाटेत कधी मोहाचे निसरडे रस्ते लागतात तर कधी लोभाची दलदल. कधी कामाच्या जंजाळात अडकतो तर कधी क्रोधाच्या झळांनी भाजून निघतो. कधी मत्सराचा विंचू डंख मारतो. तर  कधी मदमस्त जीवन जगतांना रस्ता भटकतो. 

कामक्रोधादी विकार हे "देह मी" हा भाव धरल्यामुळेच पुनःपुनः येत असतत. 

"देह मी" हा भाव प्रयत्नपूर्वक दूर सारावा लागतो. श्रवण, मनन, निदिध्यास इत्यादी साधनांनी सावरतो. आणि मग परत मार्गस्थ होतो. 

आता या मार्गावर एकच गाणे …… जिंदगी एक सफर है सुहाना…… असे म्हणत जायचे. 


मित्रांनो तुमचेही या मार्गातील अनुभव असतिलच. ते आम्हाला प्रतिक्रियातून सांगा. दैनंदिन व्यवहारात, प्रपंचात काय काय अनुभव आले ते खुल्या दिलाने share करा. 

Thursday 12 February 2015

आयुष्यावर बोलू काही

।। श्री सद्गुरु प्रसन्न ।। 
 सुरुवात …… ।। 

पुनःश्च हरीओम ।।

मध्यंतरीच्या काळात काही कारणास्तव आपली website उपलब्ध नव्हती. परंतु या नविन वर्षात नव्या स्वरुपात अधिक सुटसुटीत   User Friendly   mobile phone वर सुद्धा बघता येईल अशा तऱ्हेने सुरु करण्यात येत आहे. आपण सगळे मिळून याचा लाभ घेवूया.  पाझर अमृताचा हे आपले प्रतिक्षित नियतकालिक सुद्धा publish झाले आहे त्याची copy website वर उपलब्ध आहेजुने पाझर चे अंकवर्ष २०१०, पासून website वर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत

या website वर  "blog"  हा  सर्वांसाठी आपले मत, विचार, प्रतिक्रिया व्यक्त करण्याचे एक माध्यम. याच शृंखलेतील पहिला blog "चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही …………"

आयुष्यावर बोलू काही म्हणत असताना गुरुबोधा नंतर, श्रवणा नंतर, अभ्यासा नंतर, आपल्याला स्वतःत काय बदल जाणवाला हे बघायचे. आयुष्याचा अर्थ खालील प्रमाणे होतो … 
काराला आलेला देह
यु  - युक्तिपूर्वक सारासार विचार करून
- डरीपुंपासून 
- यातनांपासून याच जन्मी सोडवणे    
आयुष्यकाराला आलेला देह युक्तिपूर्वक सारासार विचार करून डरीपुंपासून  यातनांपासून याच जन्मी सोडवणे

गुरुमाउलीच्या सहवासात, त्यांच्या शिकवणुकीमुळे आयुष्याला नवा अर्थ प्राप्त झाला. आपल्यावर येणारे निरनिराळे कठीण प्रसंग, परीक्षांचे क्षण आणि सुखाच्या सरी या सगळ्यात त्या अर्थाचा परमार्थ झाला का?

ओंजळीतून जितक्या सहजतेने वाळू निगुन जावी तसे हे आयुष्य भरभर निसटते. आपण कुठल्या टप्प्यावर आहोत?

सोबती सोबतीने  प्रवास केला तर अधिक आनंदाचा होईल. म्हणून तर …………. 
"जर चुकीचे जरा बरोबर बोलू काही ……… 
चला दोस्तहो आयुष्यावर बोलू कहि……… "

तुम्हाला काय वाटते? तुमचा काही वेगळा विचार आहे कातुम्ही पण काही सांगा. आपल्या प्रतिक्रिया जरूर post करा.