Back to website

Friday 27 March 2015

रामराज्य


।। श्री सद्गुरु प्रसन्न ।।

रामराज्य
गुढीपाडवा झाल्यावर वेध लागतात ते श्रीरामनवमीचे. गुढीपाडव्यापासून ते श्रीरामनवमीपर्यंत बाहेर सगळीकडे रामचं नवरात्र साजरं करतत

आपणही आज खरा "राम " कशात आहे याबाबत चर्चा करणार आहोत. 

व्यवहारात आपण शब्द वापरतो, अहो, यात काही राम नाही, त्यात काही राम नाही. प्रपंचात खूप संकट आली, मानसिक त्रास झाला तर म्हणतो की "प्रपंचात काही राम उरला नाही". दिवस पालटले, स्थिती सुधारली की परत आपण त्यात रमून जातो. 

सद्गुरू आपल्याला खरा "राम" कुठे आहे हे दाखवून देतात. आत्माराम, दाशरथी राम समजावून देतात. खरा "राम" जर गवसला. समाजाला आणि बाणला, तर मग काय सगळीकडे "रामराज्य". रामराज्यात आनंदाच, समाधानच पिक भरभरून येत. 

तुम्हिही रामराज्य अनुभवता का?

सगळ्यांनी आपली मत, विचार भरभरून POST करायच्या आहेत. 
तर चला मंडळी Key Board घ्या आणि व्हा सुरू…….. 

।। श्री राम जय राम जय जय राम ।।

Wednesday 18 March 2015

गुढीपाडवा



मराठी नवे वर्ष चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा पासून सुरु होते. दरवर्षी रूढीनुसार गुढी उभारून, गोडधोड करून प्रत्येकजण आपापल्या चालीरीती प्रमाणे सण साजरा करतो. निसर्गामध्ये ही बदल घडत असतो. नविन पालवी फुलू लागते. बाहेर हे आपण दरवर्षीच बघतो. आज मात्र आपण आंतरिक गुढी कोणती? गुढीपाडवा खरा  कसा  साजरा  करायचा? हे खाली दिलेल्या पदातून बघूया -

'गु' कार अज्ञान, अंधकार, फासा गळा लागला जीवा
'ढि' ला करा हो, वाचवा हो सद्गुरु देवा s s s   l l धृ l l 

'गु' करा घेउनी गुरगुरतो जीव त्यासी समजावा
'गु 'रुगुरू नको शांतीवरी तू सद्गुरु भजावा l l l l    

'ढि'ला पडू नको परमार्थामध्ये सावध करावा l
'ढि ' येथे काही कामाची नाही,जाणुनी वागवा l l l l 

'पा'चाचा प्रपंच पाचातच राहू दे, एकात घुसवावा l
'पा'हावा परमात्मा सगळी कडे, एकच जाणावा l l l l  

''गमगु नको लटपटू नको, फटक्याने नशिबाच्या
'' कुणाची बाळगू नको, निर्भय रहावा l l l l

'वा ' कुणाची वाटू नकोगुरुगुरू वदावा
'वा 'णी माधुरीची दत्ता ठकू वदवी त्याते स्मरावा l l  l l 

ऐशा गुढीपाडव्याला 'गु'कार 'ढि' ला 'पा'डावा
स्वानंदाची गुढी उभारा साजरा पाडवा l l l l 

तुमची गुढी कशी आहे?

आपण सगळेच असा पाडवा साजरा करूया का

तुमचे विचार, नवीन ideas आणि comments लवकर post करा …. 

सर्व वाचकांना नविन वर्षाच्या शुभेच्छा!

Thursday 12 March 2015

Choices Vs Circumstances……

।। श्री सद्गुरु प्रसन्न ।।



Choices Vs Circumstances……

TRUE FRIENDS!!! Everyone of us always savor the memories of quality time spent, invaluable discussion, with TRUE FRIENDS. This is an Ahhaa…..experience each time and every time.

In one of such get-together our discussion were directed towards experiences, events in the life. The different view to look at the events. We called it as CHOICE or CIRCUMSTANCES (C&C).

It is always said that dissemination of knowledge must be done., Hence those discussion are penned down for all of my friends.


We realized that C&C is a great concept to apply in our lives. As per this concept, choice and circumstance are two sides of the coin. Coin always has a value irrespective of the visible side. Just like a coin is minted, The Dear Almighty keeps on minting values for us in form of events in our lives.

Now its up to us to see those events as Choice or as Circumstance.

When we take those events as our Choices we are enjoying the minting process. 

 When we take ourselves as victims, we are seeing it as a Circumstance. Here starts all the misery. Result we become poor victims and crying babies.

Now the question comes what is required to convert the life events to Choice ? And here came the answer from WITHIN

After all, who declares that I am victim? It is my mind.  Traditionally for a misery, we only blame and ask the question why this happens only to me?

Here if mind is molded to look at the events in positive way, then “why it happens to only me”,  is non-existent. Any situations is taken in positive spirit i.e. willingly accepted as Choice. Nothing is forced on you.

To get positive attitude, Total acceptanceUnconditional love and the Trust are the three ingredients. Now all the events of life are Choice not  Circumstances.

Now miracle starts. Positive attitude / mind teaches to oneself “You are my dear with all the pitfalls….don’t worry if you are not perfect. ‘I’ am perfect and ‘I’ will take you to that level of perfection”.


Blog by Alpa Gore

Wednesday 4 March 2015

बंद दरवाजे खोल रे ………


।। श्री सद्गुरु प्रसन्न ।।

बंद दरवाजे खोल रे ………


बंद दरवाजा म्हणजे आत असलेला बाहेर जाऊ शकत नाही आणि बाहेरचा आत येऊ शकत नाही. 

आपल्याला जवळील काही दरवाजे बंद आहेत हेच माहित नसते. कधी काळी या उघड्या असलेल्या दरवाजातून कोणी आत आलेले असते व ठाण मांडून बसले आहे याचा सुद्धा ठाव ठिकाणा नसतो. 

हे ठाण मांडून दरवाज्याच्या आत बसलेले पाहुणे म्हणजे काळाशी विसंगत जुन्या रूढी, परंपरा, विचार इत्यादी !!! आपण कळत नकळत त्यांना धरून ठेवलेले असते. 


आता यामुळे होते असे की नविन सद्यस्थितीशी सुसंगत नविन संकल्पनांना आत येण्या साठी अंत:करणाचे दार बंद रहाते.  


एक वेळ जुन्या रूढी परंपरांना दार किलकिले करून बाहेर जाऊ देतो, नविन आत येऊ देतो. पण जर विचार करून पहा आत ठाण मांडून बसलेले विचार, संकल्पना आपण बदलतो का?

उदाहरण द्यायचे झाले तर घरातील स्त्रीला सतत वाटत असते माझ्याशिवाय मुलाबाळांचे, घरादाराचे कोण करेल? मला येथे दक्ष असायलाच हवं. असा विचार करून ती आपल्याच घराच्या विश्वात गुंतून रहाते.  माझ्याशिवाय दुसरे कोण करेल हा विचार त्या स्त्रीची अडवणूक करणारं बंद दार ठरत. ज्या क्षणी ती ठरवते …… मला काहीतरी वेगळे करायचंय, बघायचंय, अनुभवायचंय…… त्या क्षणी ते दार ती स्वतः उघडते आणि नवीन विचारांची हवा आत येते. 

या ठिकाणी योग्य मार्गदर्शक पाहिजे. मार्गदर्शकामुळे विचार हे अविचार होत नाहीत. मार्गदर्शक जर सद्गुरु असेल तर सारासार विचार करण्याचे सामर्थ्य मिळते. 

मग सहजच गाण ओठावर येते …

खोलो खोलो दरवाजे
परदे करो किनारे  
खुंटेसे बंधी है हवा 
मिलके छुडावो सारे……

आणखी काही बंद दरवाजे, खिडक्या, आत बसलेले पाहुणे लक्षात येतायत का?