Back to website

Sunday 10 May 2015

छापा काटा


।। श्री सद्गुरु प्रसन्न ।।

नरसिंह जयंती उत्सव सगळ्यांना प्रिय आहे . प्रत्येक गुरुभक्त तमोगुणी हिरण्याक्ष मारून (चकाकणाऱ्या  वस्तूंना बाजूला सारून संसारातून  फट काढून ) नारद मुनीच्या  आश्रमात  जमा होतात

जस जसे श्रवणाचा आनंद घेत पुढे सरकतो ,तेव्हा आंतरिक मायेचा थारा - रजोगुणी  अहंकार, शरीरात  इकडे तिकडे पळत सुटतो लपण्यासाठी  जागा शोधत फिरतो ,त्याला  पळता भुई  थोडी होते .

"  स्मरता  नित्य हरी मग ती माया काय करी . " जसे भक्त प्रल्हादावर आत संस्कार होत असतात ,तसेच बाहेर नरसिंहाचा अवतार घडत होता. वासना बाहेर पळून गेल्याचे   त्यावर नियंत्रण ठेवल्याचे लक्षण
कुरळे केस (आयाळ )  (नखेअसत ,जड, दु: रुपाची जावून ती आंतरिक आस्ति ,भाती ,प्रिय रुपाची वळलेली दिसली
स्थूल   सूक्ष्म "मी " नाही  ह्या दोन झालेल्या खांबातून सर्व गुरुभक्त गुरगुरत  बाहेर पडत होते
गुरुनाम उंबरठ्यावर हिरण्यकश्यापुला घेतले याचे प्रतिक स्वबळावर लळीताचा मांड घालून त्यातून हिरण्यकश्यपुचे जसे कोथळे (आतडे ) बाहेर काढले तसे प्रत्येक भक्ताचे अनुभव   कळा बाहेर पडत होत्या . त्यांनाही मुक्ती मिळत होती

शिष्य माये मध्ये अडकता सगळ्या उपक्रमात आनंदाने भाग घेताना दिसत होता . साधकांना प्रमाणपत्र प्रतिक मिळा ल्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसत होता तेव्हा. व्हि शांताराम यांच्या नवरंग सिनेमातील "आधा है चंद्रमा रात आधी" गाण्याची आठवण झाली. बाहेरील स्थूळ देहावर नरसिंह अवतार धारण करून हृदयात भक्त प्रल्हाद असे रूप एकाच वेळी (संधिगत परमात्म्याचे) दिसत होते. मायेने घडलेल्या कायेला गुरुसहाय्याने हरी रूपात परिवर्तन करून रोजच्या दिनचर्येत काय काय रंग ढंग करील त्याचा सामना करण्यासाठी द्रष्टा होऊन सख्य अर्पण भक्तीचे सुदर्शन चक्र हाती घेऊन (भक्त प्रल्हाद) ते रूप अंतरात धरून बाहेर पडतांना दिसत होते

पण बर का हो…… 
  • पुढील नरसिंह जयंती पर्यंत ते रूप टिकवणे, प्रत्येक भक्ताच्या हातात असेल
  • आपण त्यांचा सांभाळ करण्यासाठी सद्गुरुंकडे शक्ती मागूया.    
  • हाच निश्चय, Good Behavior रूपाने सांभाळू
  • त्यासाठी काहिही करावे लागले तरी ते करूया
  • निजरंगात रंगून ते गुरुचरणी अर्पूया 
चल तर मग, लागा कमाला

Get Set Go