Back to website

Sunday 26 April 2015

बुरा मत देखो....


बुरा मत देखो....
बुरा मत देखोबुरा मत कहोबुरा मत सुनो हे आपण सगळेच जाणतोसहजच वाटलंकी  

बुरा मत देखो 
बुरा मत देखो म्हहणजे फक्त बाह्य दृष्टी नव्हे तर तर जे पाहतो ते आत जाऊ न देणे व त्याचा मनबुध्यादिकांवर परिणाम होऊ न देणे,  अर्थातच त्यांना तंदुरुस्त ठेवणेआपण टिव्हीवर एखादे दृश्य पाहतो किंवा एखादी हॉरर फिल्म पाहतो, त्याचा वाईट परिणाम आत जाऊ न देणेते पडद्यावरचे दृश्य समजून विसरणे! अगदी तसेच मन:पटलावर
कोरलेले सिनेमे (अनुभवपण खोटेच आहेत हे जाणले पाहिजे.

बुरा मत कहो
बुरा मत कहो म्हणजेच आपल्या मुखाने वाईट बोलू नये इतकेच सीमित नसून आतमध्ये जर नको असलेली विचारधारा उठली तर तिला झटकुन टाकता आले पाहिजे

बुरा मत सुनो
बुरा मत सुनो लाही हे लागू होतेवाईट शब्द ऐकून आपल्या आत खोल गड़बड़ होता कामा नयेमागील लेखातील 'बंद दरवाजा खोल रेमध्ये अपेक्षित दरवाजा असाच आहे नाही का? आपल्या अंत:करणाला यापासुन लांब ठेवतो व गुरुमुखाने श्रवण होताना मात्र उघडा होऊन सर्व काही ग्रहण करतोदरवाजा आपणच निर्माण केला आहे नाही का

यावर तुमचे वेगळे मत असु शकतेपण ते काय आहे हे आम्हाला कळु द्याआपल्या प्रतिक्रिया जरूर post करा.

Saturday 18 April 2015

आली आली नृसिंह जयंती ………

।। श्री सद्गुरु प्रसन्न ।।

नृसिंह जयंती जशी  जशी  जवळ येत आहे तसे  तसे  पोटात गुदगुल्या सुरु झाल्या आहेत ( butterflies in  the  stomach). एकदा कधी गोराईला पोहोचू अशी अवस्था सगळ्याच गुरुभक्तांची असते.
आपल्या जन्माची कहाणी ऐकण्याची  मज्जाच असते सगळ्यांना
गुरुदेव अगदी आरामात रंगवून रंगवून सगळ्या भक्तांना त्यांच्यातल्या प्रल्हादाची  जाणीव करून देत असतात
एका राक्षसी कुळात जन्मल्यावर सुद्धा सद्गुरुकृपेनी आणि श्रवणाने 
सद्भक्त कसा सहज वर वर जातो हे ऐकण्यात  किती मज्जा येते.   
आणि खरच आहे आपले सगळे कुळ (नोकर)  राक्षसीच असतात पण 
संत वचनांनी ते कसे बदलतात हे गुरुदेव आपल्या दाखवून देतात . 
सगळ्या बाल साधकांची तर मज्जाच असते . आपण  गुरुदेवांसमोर 
बालरूप  घेऊन  श्रवणाला बसणे  म्हणजे  स्वर्गाचाच अनुभव 
होण्यासारखेआपण हे भोगायलाच गोराईला धावत असतो पण 
गुरुदेव मात्र सतत आपल्याला ह्या मायेत कसे  सटकायचं हे शिकवत असतात . 
स्मरता नित्य हरी मग ती माया काय करी …"
नाभीस्थाना वर बसून मी विभु रूप कसा आहे हे सहज खेळातुन

नाटकातूनचित्रकलेतून आपल्या ला शिकायला मिळतआपल खर रूप पाह्यला मिळत …. जगात हरी रूप होऊन कस फिरायच आणि कशी 
सगळी मौज लुटायची हे फक्त इकडेच आपण शिकतो  
मग काय आपल सामान बांधा आणि भेटूया उत्सवात ……. 
जय देवा  …… 


ताजा कलम - या शिबिरात काय नविन आपण सादर करणार ,new ideas,suggestions  लवकरात लवकर पोस्ट करा .

Thursday 2 April 2015

हनुमान जयंती

।। श्री सद्गुरु प्रसन्न ।।

गुढीपाडवा, राम नवमी व हनुमान जयंती असा क्रम आहे.

'गुढी नभात उंचवू' असे म्हणतच पंचमहाभुतांच्या या गुढीला पंचतत्त्वांपासून वेगळे काढायचे. राम नवमी 
साजरी  होऊन राम राज्य स्थापन झाल्यावर त्याचे  पालन तर व्हावयास हवे. ते कसे? हनुमान जयन्ती 
साजरी करुनच! 

हनुमान - मारूती 
'मा' म्हणजे जी नाही पण भासते, त्या मायेला 'रु'  म्हणजे ज्ञान सूर्याने 'ती' म्हणजेच तिलांजली द्यायची. 
तेव्हाच सीता (स्वानुभूती) रामराज्यात परत येईल. त्यासाठी हनुमंतासारखी भक्ती अपेक्षित आहे.  

भक्तीची ताकद ही सर्व बळांमध्ये श्रेष्ठ असून ती पूर्णत: लीन आहे. एखाद्या व्यक्तीच्या प्रेमासाठी आपणकाहिही करायला तयार होतो. ती प्रेमाची शक्ती! भक्ती म्हणजे प्रेमाची अत्युच्य पायरी. 

सर्व शक्तींची शक्ती म्हणजेच भक्ती! हिचे रूपक म्हणजे हनुमान! जो शारीरिक बलानेही समृद्ध होता. 

ही भक्ती, शरीर, मन, बुध्दी इत्यादी समर्थ करते. बाहेरील औषधे ही नाममात्र असतात. परंतु भक्ती ही 
आंतरिक शक्तीने सर्व घडविते.

मन को जिसने मार दिया, वो हि है हनुमान । 
बाहर भक्ती भितर ज्ञान, दोनो एकसमान ।।

विविध प्रकारे, वेगळ्या पैलूने, मारुतीचे वर्णन व कार्याची या ब्लॉग वर चर्चा करूया.