Back to website

Wednesday, 4 March 2015

बंद दरवाजे खोल रे ………


।। श्री सद्गुरु प्रसन्न ।।

बंद दरवाजे खोल रे ………


बंद दरवाजा म्हणजे आत असलेला बाहेर जाऊ शकत नाही आणि बाहेरचा आत येऊ शकत नाही. 

आपल्याला जवळील काही दरवाजे बंद आहेत हेच माहित नसते. कधी काळी या उघड्या असलेल्या दरवाजातून कोणी आत आलेले असते व ठाण मांडून बसले आहे याचा सुद्धा ठाव ठिकाणा नसतो. 

हे ठाण मांडून दरवाज्याच्या आत बसलेले पाहुणे म्हणजे काळाशी विसंगत जुन्या रूढी, परंपरा, विचार इत्यादी !!! आपण कळत नकळत त्यांना धरून ठेवलेले असते. 


आता यामुळे होते असे की नविन सद्यस्थितीशी सुसंगत नविन संकल्पनांना आत येण्या साठी अंत:करणाचे दार बंद रहाते.  


एक वेळ जुन्या रूढी परंपरांना दार किलकिले करून बाहेर जाऊ देतो, नविन आत येऊ देतो. पण जर विचार करून पहा आत ठाण मांडून बसलेले विचार, संकल्पना आपण बदलतो का?

उदाहरण द्यायचे झाले तर घरातील स्त्रीला सतत वाटत असते माझ्याशिवाय मुलाबाळांचे, घरादाराचे कोण करेल? मला येथे दक्ष असायलाच हवं. असा विचार करून ती आपल्याच घराच्या विश्वात गुंतून रहाते.  माझ्याशिवाय दुसरे कोण करेल हा विचार त्या स्त्रीची अडवणूक करणारं बंद दार ठरत. ज्या क्षणी ती ठरवते …… मला काहीतरी वेगळे करायचंय, बघायचंय, अनुभवायचंय…… त्या क्षणी ते दार ती स्वतः उघडते आणि नवीन विचारांची हवा आत येते. 

या ठिकाणी योग्य मार्गदर्शक पाहिजे. मार्गदर्शकामुळे विचार हे अविचार होत नाहीत. मार्गदर्शक जर सद्गुरु असेल तर सारासार विचार करण्याचे सामर्थ्य मिळते. 

मग सहजच गाण ओठावर येते …

खोलो खोलो दरवाजे
परदे करो किनारे  
खुंटेसे बंधी है हवा 
मिलके छुडावो सारे……

आणखी काही बंद दरवाजे, खिडक्या, आत बसलेले पाहुणे लक्षात येतायत का?